Marathi New Story
Saturday, 21 March 2020
The worlds most Relaxing Waterfall part 3
<iframe width="480" height="270" src="https://www.youtube.com/embed/Iq4XuaUttKA?clip=
Saturday, 3 August 2019
Bhikari भिकारी - E02
माझे हात -पाय पकडले होते आणि एकाने सुरा माझा मानेवर धरला होता आणि त्यातल्या एकाने विचाले पयसा किधर है ..... पयसा किधर है ..... पयसा किधर है ..... मी खूप घाबरलो त्याना मी इशाऱ्याने खुणावले कि त्या पिशवीत आहे म्हणून त्यातल्या एकाने पिशवी बघितली त्यात पैसे आहेत कि नाही ते त्यात होते हे कळल्या वर ते सर्व पिशवी घेऊन पळून गेले. मी रडूही शकत नाहि ....कारण माझे अश्रूही संपले आता . मग मीं तसाच बसून राहिलो. मग काय परत उद्या पासून परत सुरु करावं लागेल भीक मागायला आणि काय करूशकतो मी गरीब माणूस .
मग मी ती झोपायची जागा म्हणजे ऐरकंडिशन जागा सोडली कारण तसाच आहे तुम्ही म्हणाल कि चोरी झाली म्हणून आणखी काय असणार ...... आहे मी जिना चढत असताना काही चारसुली / गरजुली काही मुले पहिली होती तीच मुले माझा वर हाला करता कारण आपल्याला आधीच सावध झाला पाहिजे होतं . असं होत कधी कधी मुंबई शहारा मध्ये..... विचार करता करता सकाळ झाली. आज माझा कडे सकाळी नास्ता ( न्याहारी ) करायला पैसे नाहीत. आज उपाशी पोटी भीक मागावी लागलं ..... आणि आम्हाला उपाशी राहण्याची सवय आहे. मी जर कुत्रा - मांजर असत तर किती बर झालं असत असो. माणसाचा जल्म नको असं वाटत आहे. भीक मागत असताना एक महिला माझा जवळ अली मला वाटलं कि चला थोडे पैसे कमी पडत होते खाण्या साठी पण तिने मला पोळी ( चपाती ) -भाजी दिली. "अरे वा" मनातल्या मनात बोललो चला सकाळची खाण्याची वेवस्था झाली.
दुपारी भीक मागत असताना अचानक एक मुलगा धावत गेला , त्याच्या मागे काही लोक धावत होते आणि ओरडत होते चोर .... चोर ..... चोर..... पकडा त्याला .... मग काय मीपण त्यांना सांगितले समोर गेला म्हणून..... काय बोलणार आता , हे होतच राहत या मुंबई शहरा मध्ये. या मुंबई मध्ये जगन हे खूप कठीण झालं आहे . काही वेळानी त्या चोराला दोन पोलिसांनी पकडलं आणि घेऊन गेले. चोरी करणार तर हेच होणार. चला आजचा दिवस तर गेला. संध्या कालची वेळ होती, अचानक आरडा -ओरडा सुरु झाला ...... रेल्वे स्टेशन वर, मला कानी कळले नाही काय झाले ते ... मला वाटलं काहीतरी झालं असेल. मी मग माझं काम सुरु केलं , भीक मागू लागलो. थोड्या वेळाने काही रेल्वे कर्मचारी धावत गेले , मी मनातं बोललो काहीतरी झाल आहे हे मात्र नकी ..... त्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही तरी घेऊन येत होते पांढऱ्या कपड्यातून ते हळू हळू येत होते , काहीजण डोळे बंद करत होते , एक महिला तर चकर येऊन खाली पडली ... मी थोडा घाबरलो ते कर्मचारी माझा जवळ येऊ लागले ,... बघतोतर काय ... ... ...
पुढे चालू .... /to be continued...
Friday, 26 July 2019
Bhikari भिकारी
माझ नाव भिकारी आहे. हे नाव मला या मुंबई शहराने दिले आहे. माझा जल्म कधी कोठे झाला हे हि माहित नाही. माझे आई वडील कोन हे हि मला माहित नाही. मी मुंबई शहारा मध्ये अंधेरीला राहतो. माणसाला तीन मूलभूत गरजा म्हणझे अन्न, वस्र आणि निवारा या सर्व मला मुंबईने दिल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल त्या कशा मिळाल्या. जे मिळेल ते खायचं, जे भेटेल ते वस्त्र घालायची आणि एअर कंडीशन/ नॉन एअर डिशन. प्रथम एअर कंडिशन सांगतो - रेल्वे ब्रिज आणि अंधेरी मेट्रो चे स्कायवॉक इत्यादी ...... दुतिय नॉन एअर कंडिशन - तिकीट काँटर, बस स्टोप, बंद असलेली दुकाने इत्यादी......
मी लहान असल्या पासून या अंधेरी मध्ये राहतो आहे. आम्हा भिकाऱ्यांचा अलार्म म्हणजेच सकाळच्या ट्रेनचा भोंगा, सकाळी उठल्यावर पहिला शोध असतो तो म्हणझे पाण्या साठी.... कशासाठी हे आता विचारू नका...... तुम्ही समजून घ्या. मुंबई मध्ये स्वचालय तर आहेत पण तिथे पैसे भरून जावे लागते. हे सर्व चालायचं या मुंबई शहारा मध्ये ! आत्ता सुरवात व्हयाची ती म्हणजे पोटाची खळगी भरायची. सकाळची सुरवात करायची ती भीक मागायची. भीक मागायची जागा ती म्हणजे रेल्वे स्टेशन बाहेर. एक कोपऱ्यात बसून जागा अडवायची तिथे बसून भीक मागायची. ती जागा पकडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले मला तेव्हा कुठे भेटली.
जे काही पैसे मिळतील ते घ्यायचे, आशीर्वाद द्यायचे आणि दिल्या बदल आभार मानायचे. जे काही मिळतील त्याचे काहीतरी सकाळ साठी खाऊन घेतो. आजची सकाळची सोया तर झाली, मी आज सकाळी दोन सामोसे आणि चहा पियालो.
आता दुपारी काही खाण्याची वेवस्ता करूया, पुन्हा भीक मागायला सुरवात केली.......खूप भूक लागली आहे !!.....असे बोलायचे आणि जे काही पैसे मिळत होते ते मी घेत गेलो. अश्या प्रकारे माझा अर्धा दिवस तर संपला. संध्याकाळी भीक मागत असताना एक मनुष्य आले माझ्या जवळ मी नेहमी प्रमाणे पैस्यासाठी हाथ पुढे केले, त्यांना काय झालं माहित नाही ?.... त्यांनी माझा हात पकडला आणि घेऊन चालले मला कळलं नाही काय चालाय ते, त्यांना विचारलं मी काय झालं मला कुठे घेऊन जाताय??? त्या वर ते म्हणाले कि "" भीक कशाला मागतो पोट भराय साठी "" तेच करतो आहे मी , ते मला वडापाव च्या गादीवर घेऊन गेले . मगकाय मी पण एक वडापाव खाला त्यांनी विचारलं पोट भरलं का ?..... मी पण मन हलवली नाही म्हणून , एक भजिपाव खाला.... त्यांनी परत विचारलं अजून पाहिजे का ???... मग मी मान हलवली नाही म्हणून , त्यांनी पैसे दिले त्या वडापाव वाल्याला, मग मी त्यांचे आभार मानले. त्या नंतर ते निघून गेले. असं माझाबरोबर पहिल्यांदा झाले.
भीक मागता मागता काळोख झाला. थोडे पैसे गोळा झाले होते त्यात मी रात्री साठी काही खाऊन घेतलं थोडये पैसे उरले होते ते मी माझा पिशवीत भरले आणि मी जात होतो झोपण्यासाठी, जिन्यावर काही चारसुले /गरजूले बसले होते त्यांना मी कधी पाहिलं नाही. तसाच मी पिढे चालत गेले. माझा एअर कंडिशन जागेवर जाऊन झोपलो. मी झोपेत असताना माझं तोंड दाबलं कोन्हीतरी, मी पटकन डोळे उघडले बघतोतर काय?? .....
पुढे चालू .... /to be continued...
Subscribe to:
Comments (Atom)

